Translation

Poem (translated from Hindi)

घर

मूळ हिंदीः सच्चिदानंद हिरानंद वात्सायन - अज्ञेय

Translation: जयंत गाडगीळ, समर नखाते

माझे घर

दोन दरवाजांना जोडणारे एक रिंगण

माझे घर

दोन दरवाजांच्या मधोमध

त्यात कुठूनही डोकवा

तुम्ही दरवाजातून बाहेरच बघत असाल

तुम्हांला पल्याडचे दृष्य दिसेल

घर नाही दिसणार

मीच आहे माझं घर

माझ्या घरात कुण्णी राहत नाही

मी तरी माझ्या घरात राहतो कुठे?

माझ्या घरात कुठूनही डोकवा.....

Poem (translated from Kannada)

बारमध्ये वृद्ध मद्यपी

मूळ कन्नडः एस. मंजुनाथ

Translation: जयंत गाडगीळ, समर नखाते

थरथरणारे हात

डचमळणारी वारुणी, जणू मोहक मदालसा

रागीट नजरेला कठोर कटाक्षाचे प्रत्युत्तर

दारू, नववधूसारखी खट्याळ, छेडणारी

बायकापोरांनी करवादून झिडकारलेला

आता सुटत चाललीये साथ वारुणीची

होता जिचा सहारा शेवटला

पेल्यामागून पेले

उसळून ओसंडणारे

एकमेकांना भिडणारे नि भंगणारे

वृद्ध मद्यपी पटकन रिचवतो

निमिषार्धात

आत्म्याच्या गजरात

तदनंतर उमटते स्मित विजयी वीराचे

उमटतो कडाडणारा आसूड

त्याच्या वार्धक्यावर

बिजलीचा कडाडणारा कल्लोळ

उमटतोय त्याच्या अंतरंगाच्या शोधात

Story (translated from English)

घडी केलेल्या नोटा

कॅटफिश ंकदरिस

Translation: उदय ओक, समर नखाते

त्या स्पॅनयार्डला शिकागो आवडायचं. जेवण, वास, माणसे, ब्लूज संगीत, लोकलगाड्या आणि बिल्डिंगा. सेंटपॅट्रिक्स डेला तर ते अख्खी नदी हिरवी करून टाकायचे. घोंगावणाऱ्या वाऱ्याच्या या शहरात कुठंही जा, कीहाताला काम, प्रेम आणि मस्त थंडगार बिअर भेटणारच. नरड्यात तुफानी तहान आणि डोळ्यांत अभिलाषेची सोनेरी चमकबाळगून असलेल्या आयरिश माणसांभोवती अल कपोनच्या भुताची छाया वावरत असे.

ज्यू टाऊन हा असा भाग की जिथे ज्यू माणसं आपला माल रस्त्यात आणि दुकानातही विकत. जरी काळ्यांनी तो धंदाबराचसा खेचला तरी काही ज्यू चिवटपणे तग धरून होते. नंतर आले मेक्सिकन. हिते मिळणारे त्यांचे खाद्यपदार्थम्हणजे एकदम बेष्ट, अर्थात मेक्सिकोच्या भाएर. आठवड्याचा चोरबाजार मैल अन मैल पसरलेला. कारखान्यांत आणिगोद्यांत काम करायला उत्तरेला आलेले काळे येताना मिसिसिपीच्या खोऱ्यांतून ब्लू संगीत घेऊन आले.त्यांच्या गिटारमधून अश्रू येत, सुरांतून छळाच्या वेदना. पिढी दर पिढी सरकत आलेल्या गोष्टी अन गाणी.काहींतून शांततेचा आकांत तर काहींतून गोंधळाच्या आवर्तातलं शहाणपण.

स्पॅनयार्डला जिथं काम भेटलं त्याच्या आवतीभवती त्याला हे सगळं दिसत होतं. तो स्टेक आणि आडमाप आकाराच्याबुटाएवढे बटाटे भाजत असे. वरनं जाणाऱ्या लोकलगाड्यांमुळं ष्टोव्ह अन टेबलं थडथडत असत. गाड्यांतून उतरणारीलोकं त्या खाण्याच्या जादुई वासाने तिकडं खेचली जात. पाणथळ जागच्या कंटाळलेल्या सुसरींच्या डोळ्यांचीब्लूज वाजवणारी माणसं त्या दुकानाबाहेर टुकत असत. त्यांच्या अँप्लिफायरच्या तीव्र खणखणाटात चिकण्याबायका पैशाच्या पत्र्याच्या पेट्या घेऊन गर्दीत फिरत असत. त्या पेट्यांना पैशे टाकायला एक फट आणि भलंमोठंकुलूप. त्यावर लिहिलेले "पैसे टाका, फक्त संगीत वाजवणाऱ्यांसाठी”.

नट्टापट्टा केलेल्या जाळ पुठ्ठ्याच्या या देखण्या बायका गर्दीतून लचकत मुरडत चालत असत. स्वर्गालाभिडणाऱ्या ब्लूज संगीताच्या प्रत्येक फेकीबरोबर या बायका लचकत खिदळत चाळवत असत. पुरुषाला बरं कसं वाटंलआणि त्याचा हात त्याच्या पाकिटाकडे कसा जाईल हे त्यांना पक्कं ठाउक असायचं. त्या पुरुषांबरोबर आलेल्याबायकासुद्धा हसून हात पैशाकडे नेत.

संध्याकाळ होत जाई तसतशी ब्लूज संगीतातली दादा माणसं पटावर येऊ लागत. हाउलिंग वूल्फ, विली डिक्सन, मडीवॉटर्स, बडी गाय, एल्मोर जेम्स, आणि ल्यूथर ऍलिसन. नाजुक हिऱ्यांच्या अंगठ्या, आलिशान गाड्या, उंची फरकोटआणि रस्त्यावरची माणसं एकमेकांत मिसळून जात. वरच्या थरातले इंग्लिश संगीतकार फिकुटलेल्या बायांना बरोबरघेऊन रग्गड पैशांनी भरलेल्या खिशांनी या दादा माणसांकडून गिटार शिकायला येत. त्यांच्यासाठी स्टेक आणि कंदभाजून स्पॅनयार्डचे खिसे शंभर डॉलर्सच्या नोटांनी गच्च फुगत. मिक आणि कीथ नाच शिकले, शिकवणीबद्दल खास पैसेमोजून. पेज अन प्लांट काहीबाही शिकायला येत, सोबत बॉडीगार्डस घेऊन. स्वतःला भारी समजणाऱ्या त्याबॉडीगार्डसच्या वाट्याला स्पॅनयार्ड सहसा जात नसे. पण एकदा एक इंग्लिश गिटार शिकणारा बरोबरच्या बाईलाकानफटवायला जात असताना स्पॅनयार्डने त्याला बाहेर फेकला. बॉडीगार्डला मध्ये पडायची संधी मिळाली नाहीच.लगेच बॉडीगार्डलापण धुतला.

त्याचा एक जुनाजाणता दोस्त म्हणालासुद्धा, “स्पॅनयार्ड काय नुस्ता आचारी न्हवता. शिपाईगडी होता.वडलांबरोबर एकेक फुटाच्या विटा उचलण्याचं काम सहजी करीत असे. कायबी करंल. शिगा खाऊन खिळे थुकंल अन रिबिटसहगंल.”

धन्यवाद बीबी. ल्युसिलला बोलावू काय? तुला लगेच न्यूयॉर्कला परतायची घाई नाय ना?”

किंगने आपली बोटं मोडून मोकळी केली. आणि मग त्याची गिटार किंचाळत करुणा आणि प्रेम गाऊ लागली.

- Article