शोध

जयंत गाडगीळ

असेल का कोणी

गुरू किंवा ज्ञानी

देईल मला शहाणपण

किंवा शहाणपणाचे ज्ञान,

किंवा शहाणपणाचे ज्ञान

देणाऱ्याची माहिती

मला शहाणा करणारा

असेल का स्वतःच शहाणा

कारण

रस्ता दाखवणारे बोट

म्हणजे रस्ता नसतो

आणि नसतो रस्ता

जिथे घेऊन जातो

ते ठिकाण