नको येऊस जवळ

- नागनाथ खरात

नको येऊस जवळ सये, बाभळीस डोळे

ओल्या पावसात तुझे अघोरी चाळे

वेडे हसतील सारे रानवाटेवरचे पक्षी

नको कोरूस मनाव अशी आंधळी नक्षी

पुन्हा येईल पाऊस चिंब चिंब होईल माती

गर्द झाडांच्या मिठीत बुडतील जन्म साती