संपादकीय

या द्वैमासिकाचा हा पहिला आणि छोटेखानी मराठी विभाग आपल्या हातात देताना अत्यंत आनंद होत आहे.

असतील-नसतील ते भेदभाव गहिरे करण्यासाठी इतिहास, भूगोल, राजकारण, मानसशास्त्र, भाषा या सर्वांचा प्रच्छन्नउपयोग अवतीभवती धडकी भरवणाऱ्या प्रमाणात दिसतो आहे. अशा परिस्थितीत एकत्र एका व्यासपीठावर येणे ही पहिलीपायरी ओलांडणे हे आपले ध्येय असू दे. आणि त्यासाठी साहित्याच्या प्रांगणात थोडे मुक्तपणे बागडू या.

या अंकासाठी साहित्य देणारे जयंत गाडगीळ, नागनाथ खरात आणि अमिताभ पावडे यांचे आभार मानणे औपचारिकता होईल.पण एवढे नोंदवायला हवे की या तिघांची उपस्थिती ही या एकाच अंकापुरती नसून दीर्घकालीन आहे. ‘मराठीसाहित्याच्या वाटचालीचा आढावाया मालिकेची सुरुवातही या अंकापासूनच करण्याचा इरादा होता, परंतु काहीकारणांनी तो सिद्धीस गेला नाही. पुढल्या अंकापासून अधिक मोठ्या प्रमाणावर साहित्यधन उपलब्ध करून देण्यातयेईल एवढे निश्चित.

या अंकाबद्दलचे आपले मत आणि या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा असल्यास आपले साहित्य जरूर आमच्याकडेपाठवा.